samas in marathi || समास मराठी व्याकरण || Best marathi vyakaran 2022

samas in marathi || समास मराठी व्याकरण


स्पर्धा परीक्षा मध्ये समास या घटकावर दरवर्षी प्रश्न विचारण्यात येत असतात म्हणून समासाचे सर्व प्रकार आणि त्यांचे उदाहरणे यांसाठी कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचा .

 समास मराठी व्याकरण || samas in marathi


समास : शब्दाच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात.

शब्दाच्या एकत्रीकरणाने जोडशब्द तयार होणाऱ्या शब्दाला सामासिक शब्द म्हणतात .

उदा. कांदेपोहे , विटीदांडू , घरजावई, पुरणपोळी इत्यादी


समासाचे चार प्रकार

१) अव्ययीभाव समास २) तत्पुरुष ३) द्वंद्व

४) बहुव्रीही

समास मराठी व्याकरण samas in marathi

१) अव्ययीभाव समास

ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे महत्वाचे प्रधान असते त्याला अव्ययीभाव समास म्हणतात.

अव्ययीभाव समास मराठी उदाहरणे

उदा. १) गांधीजींनी देशासाठी आमरण कष्ट सोसले

२) प्रत्येकाने गरजूंना यथाशक्ती मदत करावी

३)आदर्श वर्गात कधीच गैरहजर राहत नाही


  - अव्ययीभाव समास उपसर्ग -

१) संस्कृत भाषेतील प्रारंभी उपसर्ग- , प्रती, यथा, या

२) फारशी भाषेतील प्रारंभी उपसर्ग - दर बे ( नाही) , बिन( शिवाय)

३)मराठी शब्दांची दुरुस्ती असलेले सामासिक शब्द - वेळोवेळी , गावोगावी , दारोदारी , घरोघरी , क्षणोक्षणी , घडोघडी 


२) तत्पुरुष 

ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील दुसरे पद हे महत्वाचे प्रधान असते त्याला तत्पुरुष समास म्हणतात.

उदा. राजवाडा , बाईलवेडा , मंत्रालय , घरजावई 


हे पण वाचा : समानार्थी शब्द मराठी [ 400+ ] - important samanarthi shabd in marathi मराठी व्याकरण 2022


अ) सामासिक शब्दामध्ये विभक्ती प्रत्ययाचा लोप होत असेल तर त्यास विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात

उदा. घरजावई - घरातला जावई (सप्तमी तत्पुरुष समास )

 तोंडपाठ - तोंडाने पाठ ( तृतीया तत्पुरुष समास)

बाईल वेडा - बाईसाठी वेडा( चतुर्थी तत्पुरुष समास ) 

देवपूजा - देवाची पुजा ( षष्ठी बहुवृही समास)

गावदेवी - गावातील देवी ( सप्तमी तत्पुरुष समास ) 


ब) नन्र-तत्पुरुष समास

 सामासिक शब्दाची सुरुवात - , अन , , ना , नि , गैर यासारख्या शब्दांनी झालेली असते त्या समासास नत्र-तत्पुरुष समास म्हणतात .

उदा. नामंजूर - मंजूर नसलेला

निरोगी - रोगी नसलेला

   निर्दोष - दोष नसलेला 

  अनोळखी - ओळख नसलेला 

अपूर्ण - नाही पूर्ण ते 

गैरहजर - हजर नसलेला 

नापास - पास नसलेला


क) द्विगु समास

सामासिक शब्दातील पहिले पद हे संख्याविशेषण असते आणि दोन्ही पदावरून समूहाचा बोध होतो त्यास द्विगु समास म्हणतात .

उदा

नवग्रह - नऊ ग्रहाचा समूह 

अष्टविनायक - आठ विनायकांचा समूह

बारभाई - बारा भाषांचा समूह

चातुर्मास -चार मासांचा समूह

षणमास - सहा मासांचा समूह 

पंचारती - पाच अर्त्यांचा समूह


ड) कर्मधारय समास -

सामासिक शब्दातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असून पहिले पद हे विशेषण आणि दुसरे पद नाम असते त्यास कर्मधारय समास म्हणतात.

उदा. महाराष्ट्र - महान असे राष्ट्र 

पितांबर - पिवळे असे अंबर 

महानदेव - महान असा देव

रक्तचंदन - रक्तासारखे चंदन 

सुविचार - चांगला असा विचार


इ) मध्यम पदलोपी समास - सामासिक शब्दाचा विग्रह केल्यावर पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दर्शवतेवेळेस मधल्या पदाचा लोप होतो त्या तत्पुरुष समासास मध्यम पदलोपी समास म्हणतात

   उदा . पुरणपोळी - पुरण घालून तयार केलेली पोळी 

कंदापोहे - कांदा घालून तयार केलेले पोहे


ई) अलुक तत्पुरुष समास - तत्पुरुष समासात जर पूर्व पदाच्या सप्तमीच्या इ विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही 


samas in marathi || समास मराठी व्याकरण

उ)  उपपद तत्पुरुष समास - ज्या समासात दुसरे पद प्रधान / कृदंत असते आणि त्याला वाक्यात स्वतंत्रपणे वापरता येत नाही अशा समासाला उपपद तत्पुरुष समास म्हणतात.

उदा. शेतकरी - शेती करणारा

ग्रंथकार - ग्रंथ करणारा

पंकज - चिखलात जन्मणारे

सुखद - सुख देणारे 


३) द्वंद्व समास

सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची असतील तर त्यास द्वंद्व समास म्हणतात.

उदा. पशुपक्षी

भाजीपाला

आईवडील

विटीदांडू

भाऊबहिण

मामामामी


हे पण वाचा : जनरल नॉलेज मराठी 2022 || भारता बद्दल उपयोगी gk marathi


 अ)इतरेतर द्वंद्व समास

जर सामासिक शब्दाचा विग्रह करतेवेळी आणि या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर होत असेल त्यास इतरेतर द्वंद्व समास


उदा. आईवडील - आई आणि वडील

स्त्रीपुरुष - स्त्री आणि पुरुष

रामलक्ष्मण- राम आणि लक्ष्मण

विटीदांडू - विटी आणि दांडू


ब) वैकल्पिक  द्वंद्व समास

जर सामासिक शब्दाचा विग्रह करतेवेळी किंवा , अथवा , वा या विकल्प दर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर होत असेल त्यास वैकल्पिक  द्वंद्व समास

  

    उदा. मागेपुढे - मागे किंवा पुढे 

खरेखोटे - खरे किंवा खोटे

बरेवाईट - बरे अथवा वाईट 

पापपुण्य - पाप किंवा पुण्य 


क) समाहार द्वंद्व समास

   जर सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय तशाच प्रकारच्या आणखी घटकांचाही समावेश होतो त्यास समाहार  द्वंद्व समास म्हणतात

  उदा. मीठभाकर  - मीठ , भाकर व इतर पदार्थ

भाजीपाला - भाजी , पाला वगैरे

गाईगुरे - गाई , गुरे वगैरे

चहापाणी - चहा , पाणी वगैरे

पानसुपारी - पान , सुपारी व इतर 

शेतीवाडी - शेती , वाडी वगैरे

हे पण वाचा : भारतातील पहिले || Best [G.K] 25+ मुद्देे  

हे पण वाचा : महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी : महाराष्ट्रातील पहिले (G.k) ||  Best 50+ NCERT

हे पण वाचा : क्रियापद व त्याचे प्रकार मराठी व्याकरण (marathi grammar) 

हे पण वाचा : मराठी म्हणी

हे पण वाचा : नाम व नामाचे प्रकार

हे पण वाचा : विरुद्धार्थी शब्द

४) बहुव्रीही समास 

जर सामाजिक शब्दाची दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या शिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो तिसऱ्या पदाचे विशेषण असतो त्यास बहुव्रीही समास म्हणतात.

 उदा. नीलकंठ - ज्याचा कंठ निळा आहे असा

लंबोदर - लंब आहे उदर ज्याचे असा


Post a Comment

0 Comments