( 4 ) .क्रियापद
क्रियापद म्हणजे काय kriyapad in marathi
वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
उदाहरणे. खातो , बांधतो , धुतो , जातो , खेळतो , इत्यादी
i) राम आंबा खातो.
ii) गवंडी घरे बांधतो.
iii) धोबी धुणे धुतो.
iv) प्रभास शाळेत जातो.
( kriyapad in marathi ) क्रियापदाचे काही प्रकार प्रकार :
१) सकर्मक क्रियापद २) अकर्मक क्रियापद३) संयुक्त क्रियापद ४) साहाय्यक क्रियापद
५) द्विकर्मक क्रियापद ६) उभयविध क्रियापद
१) सकर्मक क्रियापद
ज्या क्रियापदास वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते त्या क्रियापदास सकर्मक क्रियापद असे म्हणतात.उदाहरणे. i) राजीव गाडी चालवतो.
ii) आई भांडी धुते.
*वरील वाक्यांमध्ये (चालवणे) चालवतो आणि (धुणे) धुते या क्रियापदाचा अर्थ पूर्ण झाला . पहिल्या वाक्यात गाडी व दुसऱ्या वाक्यात भांडी ह्या कर्माची गरज पडलेली आहे.
२) अकर्मक क्रियापद
ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते त्या क्रियापदास अकर्मक क्रियापद असे म्हणतात.
उदाहरणे. i) तो पळाला
ii) ती रडली
उदाहरणे. i) तो पळाला
ii) ती रडली
३) संयुक्त क्रियापद
धातूसाधित क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद या दोन्हीपासून बनलेल्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात.
उदाहरणे. i) घरासमोरून मुले पळू लागली.
( पळू-धातूसाधित क्रियापद : लागली-सहाय्यक क्रियापद )
ii) बाळ पाळण्यात रडू लागला.
( रडू-धातूसाधित क्रियापद: लागला-सहाय्यक क्रियापद )
४) साहाय्यक क्रियापद
जेव्हा धातुसाधीत आणि क्रियापद ह्या दोन्ही पासून एकाच क्रियेचा जर बोध होत असेल तर त्या धातूसादीत्याला मदत करणाऱ्या क्रियापदाला साहाय्यक क्रियापद.उदाहरणे. i) शाम एवढा पेरू खाऊन टाक.
५) द्विकर्मक क्रियापद
दोन कर्म लागणाऱ्या क्रियापदास द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात.
उदाहरणे.
i) रामाने शामला चेंडू मारला.
ii) दादाने रवीला पोहायला शकवले.
६) उभयविध क्रियापद
जेव्हा एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक आणि अकर्मक अशा प्रकारे वापरता येते म्हणून त्याला उभयविध क्रियापद म्हणतात.
उदा :- मोडले , आठवले , कापले , लोटले , उघडले
i) रामाने धनुष्य मोडले. ( सकर्मक क्रियापद )
ते लाकडी धनुष्य मोडले ( अकर्मक क्रियापद )
ii) त्याने घराचे दार उघडले. ( सकर्मक क्रियापद) त्याच्या घराचे दार उघडले ( अकर्मक क्रियापद)
0 Comments