विशेषण मराठी व्याकरण (marathi grammar)

       3. विशेषण

नामाबद्द विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात .
विशेषण मराठी व्याकरण || visheshan in marath


उदाहरणे.  मऊसर , चांगला , सुंदर , हुशार , काळा , पाच  इत्यादी

i) चांगला देवता 
ii) मऊसर केस 
iii) हुशार मुलगा 
iv) काळा रेडा 
v) पाच घोडे



    विशेषणाचे एकूण सहा प्रकार पडतात

     १) गुणवाचक विशेषण
    २) संख्यावाचक विशेषण
    ३) सर्वनामीक विशेषण
    ४) नामसाधित विशेषण
    ५) धातूसाधित विशेषण
    ६) अव्ययसाधित विशेषण



            १ ). गुणवाचक विशेषण

          नामाच्या रंगाचे, रूपाचे , आकाराचे , चवीचे किंवा कोणत्याही प्रकारचा  गुण दाखवणाऱ्या विशेषणास गुणवाचक विशेषण म्हणतात.

उदाहरणे.  पांढरा ,शूर , लहान , तिखट  , वाईट ,  दुष्ट , इत्यादी

i) पांढरा कोंबडा 
ii) शूर शिपाही
 iii) लहान मुलगा
 iv) तिखट मिरची

          २) . संख्यावाचक विशेषण
                नामांची संख्या दर्शीवल्या जाणाऱ्या विशेषणांच्या रुपास संख्यावाचक विशेषण म्हणतात.

उदाहरणे. पाच , शंभर , काही , पुष्कळ इत्यादी
  i) पाच टोपली
 ii) शंभर काकड्या 
iii) काही फुल 
 iv) पुष्कळ  गुरे(ढोरे)
         
   
  संख्यावाचक विशेषणाचे मूळ पाच प्रकार पडतात :
       - गणनावाचक संख्याविशेषण
             केवळ गणना करण्यासाठी उपयोग होणाऱ्या विशेषणास गणनावाचक संख्याविशेषण म्हणतात.

उदाहरणे. पाच , आठ , दोघे , दोन्ही , अर्धा इत्यादी

i) अर्धा पाव
 ii) आठ मनुष्य

       -  क्रमवाचक संख्याविशेषण
               वस्तूंचा क्रम दाखवण्यासाठी उपयोग होणाऱ्या विशेषणास क्रमवाचक संख्याविशेषण म्हणतात.

उदाहरणे. पहिले , दहावे ,  विसावा, शंभरावे इत्यादी

i) पाहिले मंदिर 
ii) दहावे घर
 iii)विसावा मजला


         - आवृत्तीवचक संख्याविशेषण
     
उदाहरणे.   दुप्पट , अर्धा , चौपट , दुहेरी , वीसपट इत्यादी

       - पृथकत्ववाचक संख्याविशेषण
              वेगळेपणाचा बोध  करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या विशेषणास पृथकत्ववाचक संख्याविशेषण
म्हणतात.

उदाहरणे. दोन-दोनची , पाच- पाचच्या, पन्नास- पन्नासच्या , बारा- बाराची इत्यादी

i) पाच-पाचच्या रांगा 
ii) पन्नास-पन्नासच्या गट्टी
iii) एकेक मुलगा 
iv) दोन- दोनचा गट

       - अनिश्चित संख्याविशेषण
            निश्चित अशी संख्या न दाखवणाऱ्या विशेषणास अनिश्चित संख्याविशेषण म्हणतात.

उदाहरणे. अधिक , थोडा , काही , इतर , सर्व इत्यादी

i) अधिक वेळ 
ii)  थोडा भात 
iii) काही तास  
iv) इतर व्यक्ती  
v) सर्व पक्षी


        ३). सर्वनामीक विशेषण
       
             सर्वनामांपासून तयार होणाऱ्या आणि नामांबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विशेषणास सर्वनामीक विशेषण
म्हणतात.

उदाहरणे.  ( मी: माझा , माझी , माझे )

तू: तुझा , तुझी , तुझे  )

( जो:जसा , जितका , जेवढा )

( काय:कसा , कसला )

( तो: त्याचा )

i) माझे गाव
ii) तुझे पुस्तक

हे पण वाचा : वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

     ४).नामसाधित विशेषण
           नामापासून तयार केलेल्या  विषेशणास सर्वनामीक विशेषण म्हणतात.

  उदाहरणे. पुस्तकविक्रेता  इत्यादी

i) तो फळ विक्रेता आहे .

टीप:-वरील वाक्यातील फळ हे मूळ नाम आहे आणि विक्रेता हा  नामाबद्दल माहिती सांगत आहे.

हे पण वाचा- 
नाम व नामाचे प्रकार स्पर्धापरिक्षा मराठी व्याकरण


५) . धातूसाधित विशेषण
         क्रियापदाच्या मूळ रूपा पासून बनलेल्या नामाच्या विशेषणास  धातूसाधित विशेषण म्हणतात.

उदाहरणे. पोहणारा , खाणारा , नाचणारा इत्यादी
i) तो पोहणारा मुलगा
ii) हा नाचणारा मोर

६). अव्ययसाधित विशेषण
      अव्यय लागून तयार झालेल्या विशेषणास
अव्ययसाधित विशेषण म्हणतात.

उदाहरणे. पुढे-पुढची , वर-वरचा , बाहेर-बाहेरचा इत्यादी
i) पुढची इमारत
ii) वरचा मजला
iii) बाहेरचा बगीचा

Post a Comment

1 Comments