8. केवलप्रयोगी अव्यय
केवल प्रयोगी अव्यय म्हणजे प्रशंसा , आश्चर्य , तिरस्कार , दुःख किंवा आनंद यांसारख्या मनातील भावना व्यक्त करणारा विकारी शब्द .उदा.
i) अरेरे ! काय वृद्ध म्हातारीची ही अवस्था !
ii) बाप रे ! केवढा हा पूर !
iii) शी ! किती घाण वागतो हा !
iv) शाब्बास ! रवि , तू पास झालास !
केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार खालील प्रमाणे:
१) हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय :- वावा , अहाहा ,ओहो , वा , आहा
२) शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय :- हाय , अरेरे , ऊं , हायहाय , रामराम , देवारे
३) आश्चर्यकारक केवलप्रयोगी अव्यय :- बापरे , अगबाई , अरेच्चा , ऑ , अबब , ओहो
४) प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय :- वाहवा , खासच , शाब्बास , छान , भारी
५) संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्यय :- हां , अच्छा , ठीक , बराय
६) विरोधीदर्शक केवलप्रयोगी अव्यय :- हॅट , उंहू , छे छे , अंहं , छे , छट
७) तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय :- शी , हुड , छत , छी , हट , थु:
८) संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय :- अहो , बा , ए , अरे , अगं
९) मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय :- गप , चुप
हे पण वाचा :- लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
0 Comments