क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार || kriya visheshan avyay

                 5. क्रियाविशेषण अव्यय kriya visheshan avyay

        क्रिया पदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दास क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
क्रियाविशेषण अव्यय kriya visheshan avyay

  kriya visheshan avyay क्रियाविशेषण अव्यय याचे काही प्रकार:

१) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
२) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
३) रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय
४) परिणामवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
५) प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय
६)निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय

             १) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय

                   वाक्यामधील क्रिया नेमकी कोठे घडली म्हणजेच ठिकाण किंवा स्थळ दर्शवणारा जो शब्द असतो त्याला  स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.

          दोन प्रकार पडतात:
  अ) स्थितीदर्शक:-
उदाहरणे. खाली , वर , जेथे , तेथे , मध्ये , अलीकडे , पलीकडे इत्यादी .

i) तो खाली बसतो.
ii) तेथे बसू नका.

ब)गतिदर्शक:- वाक्यातील क्रिया कोठून घडली हे दर्शविणारा शब्द म्हणजेच गतिदर्शक

उदाहरणे. खालून , दुरून , तुकडून , लांबून , वरून , जवळून इत्यादी

i) आकाश नेहमी वडाच्या झाडा जवळून जातो.
ii) तो कुत्र्याला लांबून भाकरी टाकतो.


               २)कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
                    वाक्यातील क्रिया केव्हा किंवा किती वेळा घडली हा काळ दर्शविणाऱ्या शब्दला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
       उदाहरणे. काल , दिवसा , आता , रात्री , वेळोवेळी , वारंवार , दिवसभर इत्यादी
       

    तीन प्रकार पडतात:-


        अ ) कालदर्शक : वाक्यातील क्रिया केव्हा घडली हा काळ दर्शविण्याचे काम करतो .
       उदा. उद्या , परवा रात्री , दिवसा , आता इत्यादी

        ब ) सातत्य दर्शक : वाक्यामध्ये क्रियाचे सातत्य दर्शविणाऱ्या शब्दाला सातत्य दर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
       उदा. दिवसभर , आजकाल , नेहमी , सतत इत्यादी

       क) आवृत्ती दर्शक: वाक्यामध्ये घटनेची पुनरावृत्ती दर्शवणाऱ्या शब्दाला आवृत्तीदर्शक
क्रियाविशेषण अव्यय म्हणतात .
       उदा. दररोज , वारंवार , पुन्हापुन्हा , सालोसाल  इत्यादी

   i) अभ्यासू मुले दररोज अभ्यास करतात.
   ii) वामन वारंवार मुलाला पैसे पाठवतो.

            ३) रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय
                     वाक्यमधील क्रिया ही नेमकी कशाप्रकारे घडते हे दाखवण्यासाठी वापरलेल्या शब्दाला रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
     

           त्याचे काही प्रकार:

            अ) प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय
उदा. सावकाश , हळू , फुकट , आपोआप इत्यादी

            ब) अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय:   
               म्हणजे वाक्यमधील क्रिया कशी घडली हे दाखवणारा अनुकरणदर्शक  शब्द होय.
उदा. टपटप , पटपट , चमचम , झपझप इत्यादी

           क) निश्चयदर्शक क्रियाविशेषण अव्यय :         म्हणजे वाक्यमधील क्रियेमध्ये निश्चय दर्शवतो
  उदा. नक्की , खुशाल , खरोखर इत्यादी
             
   
        ४) परिणामवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
           जेव्हा वाक्यमधील शब्द हा क्रियेचे परिणाम किंवा संख्या दाखवतो  त्याला परिणामवाचक/ संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.

उदाहरणे. भरपूर , नेहमी ,थोडा , अंत्यत , पूर्ण , जरा, कमी इत्यादी
      i) गुरुजी मुलांना नेहमी हसत खेळत शिकवतात

हे पण वाचा : happy birthday wishes in marathi

      ५) प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय
                का किंवा ना हे शब्द वाक्यमधील क्रियापदाला जेव्हा प्रश्नार्थक बनवतात त्यास प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
        उदाहरणे. i) तुम्हाला पोहता येते का?
ii) तू दररोज शाळेत जाशील ना?


      ६) निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय
               न/ ना हे शब्द वाक्यामध्ये  क्रियेचा जेव्हा विरोध/ निषेध दर्शवतात त्यां शब्दांना निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
  उदाहरणे. i) ती विसरता देवदर्शनाला देवळात जाते .
     ii) तो चुकता  दररोज सकाळी  लवकर उठून अभ्यास करतो.
   ii) तोथांबता 1500 मीटर धावतो .
   iii) तो थांबेल तर ना !

हे पण वाचा :- Anxiety meaning in marathi

हे पण वाचा : शब्दयोगी अव्यय
हे पण वाचा : 

Post a Comment

0 Comments